Special Report | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली पण त्या तुलनेत रुग्णालयातील बेड्स मात्र रिकामे
राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झालाय, मात्र रुग्णलायत दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णालयातले बेड रिकामे आहेत. रुग्ण घरच्या घरी उपचार घेऊन बरे होताना दिसून येत आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झालाय, मात्र रुग्णलायत दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णालयातले बेड रिकामे आहेत. रुग्ण घरच्या घरी उपचार घेऊन बरे होताना दिसून येत आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. आज कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत, तर राज्यात आज ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 8 करोना बाधित रुग्णाांच्या मत्युंंची नोंद झाली आहे. कोरोनाची ही स्फोटक वाढ धडकी भरवणारी आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.