Mumbai Nurses Protest | मुंबईत पालिका रूग्णालयातील परिचारिका आक्रमक, ‘या’ मागणीकरता उतरल्या रस्त्यावर
VIDEO | मुंबई पालिका रूग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन, कोणत्या मागणीसाठी परिचारिका आक्रमक
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील परिचरिकांनी (Mumbai Nurses Protest) आज पालिकेच्या एम दक्षिण विभाग कार्यालयासमोर आंदोलन केल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील सर्व पालिका रूग्णालयातील परिचरिका आक्रमक होत त्यांनी रस्त्यावर उतरत या आंदोलनात मोठा सहभाग दर्शवला आहे. आठवड्याला 2 सुट्ट्या लागू करण्याच्या मागणीसाठी मुंबईत परिचारिकांनी हे आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. कामाचा पाच दिवसांचा आठवडा करण्याची प्रमुख मागणी या परिचरिकांची आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या कर्मच्याऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा आहे पण पालिकेतील परिचरिकांना मात्र आठवडाभर काम करावं लागतं आहे. पालिकेच्या सर्वच रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्ण जास्त आणि परिचारिका कमी अशी स्थिती असल्याने परिचरिकांना जास्त काम करावं लागतं आहे. पालिकेतील सर्व संघटनेच्या परिचरिका ह्या आंदोलनात सामील झाल्यात. जो पर्यंत मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत पालिकेच्या एफ दक्षिण विभागासमोरून हलणार नसल्याचा पवित्रा ह्या परिचरिकांनी घेतला.