Ramdas Athawale | प्रकाश आंबेडकरांकडून मत खाण्याचं राजकारण, रामदास आठवलेंची घणाघाती टीका
त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचितकडून मतं खाण्याचं राजकारण होत आहे. युती केल्याशिवाय कठीण आहे, असं ते म्हणाले.
रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. 2014मध्ये शिवसेनेचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत युती करावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. रामदास आठवले आज अमरावतीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिपब्लिकन ऐक्यावरही भाष्य केलं. लोक तर सगळे म्हणतात हाय हाय… लोक तर सगळे म्हणतात हाय हाय… रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच काय? अशी चारोळी करत त्यांनी ऐक्यावर अधिक बोलणं टाळलं. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचितकडून मतं खाण्याचं राजकारण होत आहे. युती केल्याशिवाय कठीण आहे, असं ते म्हणाले.