नववर्षाच्या जल्लोषावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, मुंबई पोलीस सर्तक

| Updated on: Dec 31, 2021 | 10:22 AM

नववर्षाच्या (New Year) जल्लोषावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे.  नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानं मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत.

मुंबई : नववर्षाच्या (New Year) जल्लोषावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे.  नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानं मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत.नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वांनाच अलर्ट केलंय. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्यात. शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, सर्व पोलिसांना कामावर येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मुंबईतली महत्त्वाची स्थानके दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.

धक्कादायक! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पुण्यात जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार
Pune Bull Race | पुण्यात उद्या पहिली बैलगाडा शर्यत, आतापर्यंत 703 मालकांकडून नाव नोंदणी