Lok Sabha Speaker Purandeswari : लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाणार?

| Updated on: Jun 11, 2024 | 1:09 PM

लोकसभा निवडणुकीत 16 जागा जिंकणारे TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना NDA सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात लोकसभा अध्यक्षपद हवे आहे, अशी अट यापूर्वी होती. तर भाजपला ते स्वतःकडे ठेवायचे आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता....

Follow us on

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींच्या टीममध्ये 72 मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएच्या घटक पक्षांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत 16 जागा जिंकणारे TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना NDA सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात लोकसभा अध्यक्षपद हवे आहे, अशी अट यापूर्वी होती. तर भाजपला ते स्वतःकडे ठेवायचे आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा आहे. त्या डी. पुरंदेश्वरी या तीन वेळा आंध्रप्रदेशातून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे डी. पुरंदेश्वरी या दिवंगत नेते एन टी रामाराव यांच्या कन्या आहेत. याचबरोबर डी. पुरंदेश्वरी या टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांची मेहुणी आहेत.