शोकप्रस्तावानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित, विधानभवनाबाहेर विरोधकांची घोषणाबाजी

| Updated on: Mar 03, 2022 | 1:59 PM

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरू झालं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरू झालं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. भाजपानं आक्रमक भूमिका घेतली असून नवाब मलिक हाय हायच्या घोषणा तर भाजपानं दिल्याच. त्याचबरोबर जुते मारो सालों को, अशी आक्षेपार्ह घोषणाबाजीही भाजपाच्या आमदारांनी केलीय. भाजपा नेत्यांच्या या आंदोलनात काही वेळानंतर विधान सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसदेखील (Devendra Fadanvis) सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी यावेळी केली. शोकप्रस्तावानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं आहे. विधानपरिषदेचं कामकाजदेखील दिवसभरासाठी स्थगित झालं आहे.

Published on: Mar 03, 2022 01:59 PM
नवाब मलिक यांना पाठिशी घालणार असेल तर, ठाकरे सरकार हे दाऊद इब्राहिम समर्पित सरकार- फडणवीस
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक? : छगन भुजबळ