जतंरमतंरवरील कुस्तीपटू आंदोलक आक्रमक, त्यांचे पदकं गंगेत विसर्जित करणार अन्…
VIDEO | भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची कुस्तीपटूंची मागणी
नवी दिल्ली : भाजपचे आमदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूवर केलेल्या लैगिंक शोषणाच्या प्रकरणावरून महिला कुस्तीपटू अद्याप आक्रमक भूमिकेत आहे. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू केंद्र सरकारचा निषेध म्हणून आता त्यांना मिळालेले पदक ते गंगेत विसर्जित करणार आहे. यानंतर ते दिल्लीच्या इंडिया गेटवर उपोषण करणार आहेत. मंगळवारी ( 30 मे) सर्व आंदोलक पैलवान आपले मेडल संध्यकाळी सहा वाजता हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करतील, अशी पैलवान विनेश फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारावाईनंतर दोन दिवसांनी विनेश फोगाटने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: May 30, 2023 03:33 PM