Pakistanच्या Karachiमध्ये आलेलं धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं ?
मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. याबाबत हवामान विभागाकडून अद्याप स्पष्टोक्ती नाही. येत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहणार असं जरी सांगण्यात आलं असेल तरी मुंबईकरांना याची कोणतीच माहीती नसल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे.
मुंबई : हवामानातील आमूलाग्र बदलाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पांढऱ्या रंगाची चादर पसरली. ढगाळ वातावरणाचा गाडी मालकांना फटका बसला आहे. मुंबईचा दुचाकी, चारचाकी आणि घरांवर पांढऱ्या पावडरचं साम्राज्य पसरलं आहे. मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. याबाबत हवामान विभागाकडून अद्याप स्पष्टोक्ती नाही. येत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहणार असं जरी सांगण्यात आलं असेल तरी मुंबईकरांना याची कोणतीच माहीती नसल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे.