Special Report | त्रिपुरात घटना, महाराष्ट्रात हिंसाचार!

Special Report | त्रिपुरात घटना, महाराष्ट्रात हिंसाचार!

| Updated on: Nov 12, 2021 | 8:58 PM

त्रिपुरा घटनेविरोधात काही ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला हिंसक वळण लागले आणि दंगलीची परिस्थिती निर्माण झाली. त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरात उमटले आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागलं आहे. जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि काही भागात जाळपोळ करण्यात आलीय.

मुंबई : त्रिपुरात घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद आज महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल शहरांमध्ये काही मुस्लिम संघटनांकडून आज बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, भिवंडी शहरांचा समावेश आहे. त्रिपुरा घटनेविरोधात काही ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला हिंसक वळण लागले आणि दंगलीची परिस्थिती निर्माण झाली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

Shambhuraj Desai | नांदेड, मालेगाव, अमरावतीत निषेध मोर्चाला गालबोट, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
मालेगाव, अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांनी दक्ष राहावे : Dilip Walse-Patil -TV9