साताऱ्यामध्ये शेतकरी विकास पॅनलचा डंका, ‘मविआ’चा सुपडासाफ
VIDEO | साताऱ्यातील मेढा बाजार समितीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय, कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा
सातारा : मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये 12 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार मकरंद पाटील यांनी एकत्र येऊन उभे केलेल्या शेतकरी विकास पॅनल यामध्ये विजयी झाला आहे. एकूण 18 जागांपैकी याआधी 6 जागा शेतकरी विकास पॅनलच्या बिनविरोध झाल्या होत्या. तर उरलेल्या 12 जागांसाठी 22 जण रिंगणात उतरले होते. यामध्ये 18/0 या फरकाने शेतकरी विकास पॅनल विजयी झाला आहे. मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतच दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये दुसऱ्या गटात राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते सदाशिव सपकाळ यांच्या गटाला मात्र हार पत्करावी लागली आहे. या निकालानंतर मेढा येथे विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मतमोजणीच्या ठिकाणी मेढा पंचायत समिती समोर गुलालाची उधळण केल्याचे पाहायला मिळाले.