रंगात रंगूनी रंग वेगळे अन् गुंत्यात गुंतुनी पाय मोकळे? सत्ताधारी विरोधकांच्या गुंतागुंतीचा तिढा नेमका काय?
VIDEO | भूमिका एक वागणं दुसरंच? राजकारणातील सत्ताधारी विरोधकांच्या गुंतागुंतीचा तिढा नेमका काय, रंगात रंगूनी रंग वेगळे अन् गुंत्यात गुंतुनी पाय मोकळा अशी स्थिती सध्या राज्यातील सर्व राजकीय नेत्यांची... बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय पक्षांच्या भूमिका चर्चेत आहेत. कधी सत्तेतील गट विरोधात बसतोय, तर कधी विरोधी पक्षातील पक्षनेत्यासह लोक सत्तेत जाताय. रंगात रंगूनी रंग वेगळे अन् गुंत्यात गुंतुनी पाय मोकळा अशी स्थिती सध्या राज्यातील सर्व राजकीय नेत्यांची आहे. शरद पवार म्हणताय जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर ईडीचा दबाव आहे. मात्र यावर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी त्यासोबत काही संबंध नसल्याचे म्हटले. तब्येत खराब असल्याने साताऱ्यात गेलेले शिंदे पुण्यातील कार्यक्रमात गैरहजर असल्याचे समोर आले. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री बांबू लागवड पाहणी करण्यासाठी गेले होते. तर स्वतः शिंदे यांचे आमदार शिंदे यांची तब्येत खराब असल्याचे म्हणताय. पण हाच प्रश्न शिंदे यांना केल्यावर त्यांनी वेगळंच उत्तर दिलंय. बघा काय म्हणताय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…