‘गादीचे वारस स्वतःहून शिवसेनेकडे गेले होते’,विनोद पाटलांची प्रतिक्रिया
छत्रपती घराण्याचा मुख्यमंत्री सन्मान करतील असा विश्वास संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शिवेसनेची राजकीय कोंडी झाल्याचं सांगितलं जात होतं. परंतु आज याबाबतच्या सर्व चर्चा आणि तर्क वितर्कांना शिवसेनेनं पूर्णविराम दिलेला आहे.
शिवसेनेनं (Shivsena) कोल्हापूर (Kolhapur) चे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिलेली आहे.अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना उमेदवारी देणार की शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना शिवसेना राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून संभाजी छत्रपती यांनी थेट घराण्याचा दाखलाही दिला होता. छत्रपती घराण्याचा मुख्यमंत्री सन्मान करतील असा विश्वास संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शिवेसनेची राजकीय कोंडी झाल्याचं सांगितलं जात होतं. परंतु आज याबाबतच्या सर्व चर्चा आणि तर्क वितर्कांना शिवसेनेनं पूर्णविराम दिलेला आहे.