ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, ‘हे’ 17 उमेदवार लढणार लोकसभा

| Updated on: Mar 27, 2024 | 1:24 PM

लोकसभा निवडणुकीसाठी 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही असून 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बघा कोण लढणार लोकसभा?

शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही असून 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा येथून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ- संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे- पाटील, सांगली -चंद्रहार पाटील, हिंगोली- नागेश अष्टीकर, छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे, धाराशीव- ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक- राजाभाऊ वाझे, रायगड – अनंत गिते, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत, ठाणे- राजन विचारे, मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील, मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत, मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई आणि परभणी- संजय जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई वायव्य या मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Published on: Mar 27, 2024 01:24 PM
महादेव जानकर यांच्यासारखीच राजू शेट्टींबद्दल मविआला शंका? काय म्हणाले जयंत पाटील?
महाराष्ट्रातील ‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकर स्वतः कुठून लढणार?