राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाची बैठक, उद्धव ठाकरे यांनी काय दिले आदेश?

| Updated on: May 17, 2023 | 3:51 PM

VIDEO | शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? कशावर झाली चर्चा

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाची बैठक बुधवारी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात ही बैठक झाली. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांनी हजेरी लावली होती. या बैठकीत आगामी मेळावा, शिवसेना वर्धपान दिनासह विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी निर्णयांची माहिती दिली तर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना काही आदेशही दिलेत. ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वास्तव जनतेपर्यत पोहोचण्यासाठी निकालाची प्रत आणि त्यातील ठळक मुद्दे कार्यकर्त्यांना आता सर्व जिल्हाप्रमुखांनी समजून सांगायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गट आणि भाजप संभ्रम निर्माण करतंय, ते लोकाना समजून सांगा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आपल्या बाजूने असलेले सकारात्मक मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, प्रतोद म्हणून गोगावले आणि गटनेते म्हणून शिंदेंना न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलं ते जनतेला पटवून द्या… तर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा 18 जून रोजी भव्य मेळावा मुंबईत होणार आहे. तसेच 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन हा आनंदोत्सवात साजरा केला जाणार असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

Published on: May 17, 2023 03:47 PM
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय ठरलं? अंबादास दानवे म्हणाले…
राष्ट्रवादी पक्ष संघटनेत लवकरच भाकरी फिरणार, कोणते होणार बदल?