VIDEO : Raj Thackeray Goregaon सभेदरम्यान स्टेज कोसळलं

| Updated on: Feb 19, 2022 | 2:50 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज कोसळला. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज कोसळला. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कुणालाही दुखापत झाली नाही. राज ठाकरे स्टेजच्या पुढे होते त्यामुळे त्यांनाही काही झालं नाही. ही घटना घडल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि काळजी घ्या असं कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी कार्यक्रम सुरू ठेवला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

VIDEO : Narayan Rane | Sanjay Raut यांना नारायण राणेंचे चिमटे
Disha Salian हिच्या वडिलांनीही हात जोडले, विषय थांबवा | Kishori Pednekar