Nana Patole | प्रभू श्रीरामानंतर देशभर पदयात्रा करणारे राहुल गांधी चौथे व्यक्ती, नाना पटोले यांचा अजब दावा

| Updated on: Sep 11, 2022 | 5:18 PM

Nana Patole | प्रभू श्रीरामानंतर देशभर पदयात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे व्यक्ती असल्याचा अजब दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole | प्रभू श्रीरामानंतर देशभर पदयात्रा करणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) हे चौथे व्यक्ती असल्याचा अजब दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. उत्साहाच्या भरात पटोले यांनी पदयात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे व्यक्ती असल्याचा दावा करत गजहब माजवला. आता त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी गोटातून काय प्रतिक्रिया येईल ते कळेलच. नाना पटोले रविवारी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या देशात सुई तयार होत नव्हती, तेव्हापासून ते रॉकेट, सॅटेलाईट तयार करेपर्यंतच्या विकासाच्या प्रवासात काँग्रेसने या देशाला मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे काँग्रेस विकासाच्या आड येणार नाही. चिपळून येथील रिफायनरीच्या वादाविषयी ते बोलत होते.

काय केला दावा

या देशात प्रभू श्रीरामांनी कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास केला. त्यानंतर शंकराचार्यांनी संपूर्ण भारत पायी पिंजून काढला. स्वामी समर्थ यांनी संपूर्ण भारत भ्रमंती केली. त्यांच्यानंतर आता राहुल गांधी पायी संपूर्ण देशात फिरत असल्याचा दावा त्यांनी केला. सत्ताधारी मंडळी मोठ मोठ्या कारमधून बडेजाव दाखवत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Nana Patole | चीनची चमचेगिरी करणाऱ्यांनी राहुल गांधींच्या टी शर्टवर बोलू नये, नाना पटोले यांची टीका
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन, वयाच्या 99व्या वर्षी अखेरचा श्वास