Shiv Sena | सुप्रीम कोर्टात सोमवारी ‘या’ दोन याचिकांवर होणार सुनावणी, नेमकं काय घडणार?
VIDEO | महाराष्ट्राच्या राजकारणातील दिल्लीतून मोठी बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात होणार शिवसेनेच्या दोन याचिकांवर सोमवारी सुनावणी, नेमकं काय घडणार?
नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२३ | शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावणी सुप्रीम कोर्टात सोमवारी पार पडणार आहे. शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हाबाबत १८ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. यासह ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केलीय. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी दाखल झाली होती, पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. मात्र आता सोमवारी नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Published on: Sep 15, 2023 10:55 PM