Taliban | तालिबान्यांनी तयार केली किल लिस्ट, घराघरात जाऊन सर्च ऑपरेशन

Taliban | तालिबान्यांनी तयार केली किल लिस्ट, घराघरात जाऊन सर्च ऑपरेशन

| Updated on: Aug 17, 2021 | 6:44 PM

सध्या तालीबान्यांच्या ताब्यात अफगानमधील सर्व एक्झिट पॅाइंट असल्याने, तिथल्या नागरिकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात पळण्याशिवाय पर्याय नाही. सध्या अफगानीस्थानमधील स्थिती अंधकारमय आहे, असंही अभय पटवर्धन म्हणाले.

नागपूर: अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात आल्यानंतर तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानमधील ज्या अफगाणी नागरीकांनी अमेरिकेसह मित्र देशांच्या सैनिकांना मदत केली, असे तीन ते चार लाख लोक आहेत. आता तालिबानी या लोकांना खबरे म्हणून मारतील, अशी भीती सुरक्षा तज्ज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केलीय. सध्या तालीबान्यांच्या ताब्यात अफगानमधील सर्व एक्झिट पॅाइंट असल्याने, तिथल्या नागरिकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात पळण्याशिवाय पर्याय नाही. सध्या अफगाणिस्तानमधील स्थिती अंधकारमय आहे, असंही अभय पटवर्धन म्हणाले.

Breaking | अफगाण विद्यार्थ्यांनी घेतली आदित्या ठाकरे यांची भेट
Breaking | भारतीयांना आणण्यासाठी विमानं भाडेतत्वावर घेणार, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची माहिती