Solapur | सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टॉवरमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवर इतरत्र हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विविध प्रश्नांसाठी वारंवार टॉवरवर चढून नागरिकांकडून आंदोलन करुन पोलीस आणि प्रशासनाला वेठीस धरले जात होते, आंदोलनकर्ते टॉवरवर जाऊ नये म्हणून टॉवरच्या आजूबाजुला करण्यात आली होती जाळी, मात्र तरीही टॉवरवर चढून आंदोलन केले जात होते.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवर इतरत्र हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विविध प्रश्नांसाठी वारंवार टॉवरवर चढून नागरिकांकडून आंदोलन करुन पोलीस आणि प्रशासनाला वेठीस धरले जात होते,
आंदोलनकर्ते टॉवरवर जाऊ नये म्हणून टॉवरच्या आजूबाजुला करण्यात आली होती जाळी, मात्र तरीही टॉवरवर चढून आंदोलन केले जात होते. जिल्हाधिकारी कार्यालयालगतच टॉवर असल्याने आंदोलक लक्ष वेधून घेत होते, मात्र वारंवार होणारे आंदोलन आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी टॉवर इतरत्र हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.