ये हाथ नहीं हथौड़ा है ! अयोध्येत मुख्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डची चर्चा, वजन अन् उंची ऐकून व्हाल थक्क

| Updated on: Apr 08, 2023 | 9:11 PM

VIDEO | अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी विशेष अंगरक्षक तैनात, नावही आहे भन्नाट बघा व्हिडीओ

लखनऊ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर असून नुकतेच ते लखनऊ दौऱ्यावर दाखल झाले आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून एक विशेष बँड पथक लखनऊ विमानतळावर तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, उत्तरप्रदेश सरकारने खली सारखाच एक दिसणारा बॉडीगार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी खास तैनात करण्यात आला आहे. तर सोनू टायगर असं या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड हे सोनू टायगर याच्यासोबत अयोध्येत आहेत. सोनू टायगर याची उंची 7 फूट 2 इंच आणि दीडशे किलो त्याचं वजन असल्याची माहिती महेश गायकवाड यांनी दिली. सोनूकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. तो उद्या दिवसभर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येत तैनात असणार आहे.

Published on: Apr 08, 2023 09:05 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवली, बंदोबस्तात वाढ अन् ताफ्यात अजून काय बदल?
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अयोध्येत दाखल होताच एकनाथ शिंदे म्हणाले…