संपूर्ण महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्याच्या फेसबुक लाईव्ह कडे लक्ष! थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार

| Updated on: Jun 22, 2022 | 5:34 PM

काहीच वेळात आता उद्धव ठाकरे लाईव्ह येणार आहेत. मुख्यमंत्री काय बोलतील याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

मुंबई: हिंदुत्वासाठी (Hinduttva) सत्तेची लाचारी पत्करणार नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत 40 हून अधिक आमदार हे आपल्यासोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. एकूण 46 आमदार (MLA) आमच्या सोबत आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय. शिवसेनेचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये आहेत. राजकीय भूकंपाचं सत्र अजूनही सुरूच आहे. काहीच वेळात आता उद्धव ठाकरे लाईव्ह येणार आहेत. मुख्यमंत्री (Chief Minister) काय बोलतील याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

Published on: Jun 22, 2022 05:34 PM
मंत्रिमंडळ बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
आमदारांना न भेटण्याचं कारण नेमकं काय? उद्धव ठाकरे म्हणाले…