Women Maharashtra Kesari : ‘दिपाली सय्यद यांनी कुस्तीत राजकारण आणू नये’
VIDEO | महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात? कुस्तीगीर परिषदेचे नामदेवराव मोहिते काय म्हणाले...
सांगली : सांगलीमध्ये 23 मार्चपासून महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार आहेत. पहिल्यांदाच महिलांच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत आणि याचा बहुमान सांगली शहराला मिळाला असून या स्पर्धांसाठी जय्यत तयारी आता सुरू झाली आहे. सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते नारळ फोडून मैदान उभारण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आणि सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते, शिवाजी मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सांगलीच्या मिरज रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा संपन्न होणार असून राज्यातले 45 संघ आणि साडेचारशेहून अधिक महिला कुस्तीगीर यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत.
Published on: Mar 21, 2023 09:00 PM