OBC Reservation | ओबीसींच्या इम्पेरिकल डेटाचं काम मागसवर्ग आयोगाकडे
ओबीसींच्या इम्पेरिकल डेटाचं काम मागसवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आले आहे.ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवून देण्यासाठी तुम्हीही केंद्राकडे पाठपुरावा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना केलं आहे.
ओबीसींच्या इम्पेरिकल डेटाचं काम मागसवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आले आहे.ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवून देण्यासाठी तुम्हीही केंद्राकडे पाठपुरावा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्रं पाठवलं आहे. त्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. राज्य सरकारला ओबीसींच्या आरक्षणाची काळजी आहे. त्यामुळे दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेऊन या आरक्षणावर चर्चा करण्यता आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर घटनात्मक मार्ग काढण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.