नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत नवनिर्वाचित नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले…

| Updated on: May 21, 2023 | 9:44 PM

VIDEO | राज्यातील नाट्यगृहांची दुरावस्था आणि असुविधांबाबत प्रशांत दामले यांची सकारात्मक प्रतिक्रिया

ठाणे : राज्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा विषय सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता वैभव मांगले यांची यासंदर्भातील एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. दरम्यान, यावर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी भाष्य केले आहे. नाट्यगृहाच्या दुरावस्थेचा विषय खूप जुना आहे. आता शासनाचं लक्ष त्याकडे गेलं आहे. साधारण ४९ नाट्यगृह सुरू आहे. त्यांचा अभ्यास करून कुठे काय कमतरता आहे, हे प्रशासनाने पाहिलं आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांमध्ये नाट्यगृहातील प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असा विश्वास प्रशांत दामले यांनी व्यक्त केला. नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत, नाट्यगृहामधील असुविधांबाबत या आधी देखील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी भरत जाधव यांनी देखील रत्नागिरीमध्ये नाट्यगृहांबाबत दुरावस्था व्यक्त केली होती. यावेळी भरत जाधव यांनी परत कधी रत्नागिरीत प्रयोग करणार नाही असं सांगितलं होतं. याबातत प्रशांत दामले म्हणाले, नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत तसेच नाट्यगृहांमधील असुविधांबाबत सरकारकडे गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. सरकार व प्रशासन दोघेही सकारात्मक आहेत पुढील सहा महिन्यांमध्ये नाट्यगृहे सुस्थितीत होतील असे दामले यांनी सांगितले.

 

 

Published on: May 21, 2023 09:44 PM