मग सर्वात आधी राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल – संजय राऊत

| Updated on: Jan 27, 2022 | 2:43 PM

मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (tipu sultan) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित  (raj purohit) यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (tipu sultan) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित  (raj purohit) यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका.

Published on: Jan 27, 2022 12:16 PM
अजित पवारांचा मुलगा जय पवार याचे कारनामे उघड करणार, तो तुरुंगात जाणार : किरीट सोमय्या
EP2: Bas Evdhach Swapn | काय आहे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बजेटकडून अपेक्षा | Money9