नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा! कधी होणार राज्यात मान्सूनची एन्ट्री?

| Updated on: Jun 09, 2023 | 9:09 AM

VIDEO | राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्यानं काय म्हटलं...?

मुंबई : आज राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यापूर्वीच राज्यात आज मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. उन्हाच्या कडाक्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. अशातच नैऋत्य मौसमी वारे काल केरळमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे पावसाला पोषक परिस्थिती असल्याने येत्या ४८ तासांत राज्यात पाऊस बरण्याची शक्यता आहे. यासह ११ जूनपर्यंत गोवा,  १३ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचीही माहिती हवामान खात्यानं दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तर १५ जूनच्या आधी विदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर १५ दिवसांत विदर्भात येत असतो. आता अरबी समुद्रात एक सायक्लोन बनताना दिसतो आहे. त्यात मान्सूनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या विदर्भाच्या तापमानात वाढ होणार आहे.

Published on: Jun 09, 2023 09:09 AM
मृग नक्षत्र लागले तरीही गोंदियात रखरखतं ऊन, तापमान पोहोचले ‘इतक्या’ अंशावर
माणसांप्रमाणे पशुपक्षांनाही मान्सूनची प्रतिक्षा, शेतात मोराची मनसोक्त भटकंती