हितसंबंधी लोकांचा पुणे पोलिसांवर दबाव- नीलम गोऱ्हे
"पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर ज्या अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, त्यांच्याबद्दल अजूनही तपास झाला नाही. त्यांच्या पाठीमागे कोण होतं हे तपासलं गेलं नाही."
“आज आम्ही शिवसेनेच्या वतीने पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना निवेदन दिलं आहे. ज्या ठिकाणी आरोपींना अटक झाली नाही, ज्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांना जीवघेणी मारहाण होऊनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, अशाचे डिटेल निवेदन आम्ही त्यांना दिलं आहे. पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर ज्या अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, त्यांच्याबद्दल अजूनही तपास झाला नाही. त्यांच्या पाठीमागे कोण होतं हे तपासलं गेलं नाही. जे शिवसेना पदाधिकारी तिकडे नव्हते, त्यांच्याविरोधात गंभीर कलमांचे गुन्हे दाखल केले गेले”, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. हितसंबंधी लोकांचा पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Published on: Aug 04, 2022 02:44 PM