पाण्यासाठी शेतकरी ढसाढसा रडले अन् अधिकाऱ्यांचे पाय धरले, कुठं पाण्यासाठी वणवण?

| Updated on: Aug 25, 2023 | 11:58 PM

VIDEO | शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली आपली कैफियत, सांगलीच्या जत तालुक्यातील माडग्याळ सह सात गावांना म्हैसळ योजनेतून पाणी मिळावे म्हणून पाण्यासाठी शेतकरी अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडले

Follow us on

सांगली, २५ ऑगस्ट २०२३ | सांगलीच्या जत तालुक्यातील माडग्याळ सह सात गावांना म्हैसळ योजनेतून पाणी मिळावे म्हणून मायथळ कॅनॉल मधून चर काढून माडग्याच्या तलावात पाणी सोडावे म्हणून शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षापासून मागणी होती. त्यास अनुसरून जिल्हा बँकेचे संचालक जमदाडे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून चर खुदाईसाठी खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून चर खुदाईसाठी शासनाच्या मशनिरी उपलब्ध करून दिल्या. तसेच खासदार फंडातून डिझेल साठी 12 लाखाचा निधी मिळाल्यावर या कामाला सुरुवात झाली. मात्र आज दुसऱ्याच दिवशी वन विभागांनी सदरची जागा ही आमची आहे. म्हणून जागेवर येऊन काम बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडत शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. साहेब खूप वाईट परिस्थिती आहे. काम बंद करू नका गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाण्याची वाट पाहतोय. असे म्हणत अधिकाऱ्यांचे पाय धरले. मात्र वन विभागांनी काम सुरू होऊ दिले नाही. त्यामुळे 400 हून अधिक शेतकरी माळावर बसून आहेत. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.