पंकजाताई राजकारणात फूलस्टॉप नसतो- चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 09, 2022 | 2:23 PM

"पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी नाकारल्याने फार काही मोठी घडना घडलेली नाही. राजकारणात यानंतरही संधी मिळतच असतात," अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी नाकारल्याने फार काही मोठी घडना घडलेली नाही. राजकारणात यानंतरही संधी मिळतच असतात,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, “इच्छा असणं आणि इच्छा पूर्ण न झाली तर नाराज होणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. पण ही नाराजी भाजपमध्ये फार काळ टिकत नाही. नेताही लगेच समजावतो अरे बाबांनो तुम्ही हे करून माझं नुकसान करत आहात. त्यांना हे समजावतो यातून काय संपलं का. राजकारणात फुलस्टॉप नसतो. कॉमा असतो. जो फुलस्टॉप मानत नाही. तो कॉमा मानून पुढचं काही आपल्याला मिळेल, आपल्यावर सोपवेल याची अपेक्षा धरतो. पंकजा ताई या सगळ्या त्याच्याशी संबंधित त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आक्रमक झालेल्यांना समजावतील.”

Published on: Jun 09, 2022 02:23 PM
VIDEO : Pankaja Munde यांना उमेदवारी न दिल्याने टरबूज फोडून आंदोलन
मिळालेल्या संधीचं सोनं करेन- एकनाथ खडसे