Special Report | एसटी कर्मचाऱ्यांवर 20 तारखेपर्यत मेस्मा नाही ?

Special Report | एसटी कर्मचाऱ्यांवर 20 तारखेपर्यत मेस्मा नाही ?

| Updated on: Dec 17, 2021 | 9:31 PM

निलंबित झालेल्या कामगारांवर कारवाई सुरू आहे. काही बडतर्फ झाले आहेत. या कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत असं त्यांना सांगितलं जात आहे. त्यामुळे कर्मचारी संपात आहेत. पण लोकांना वेठीस धरणं योग्य नाही. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून मेस्मा लावला जातो.

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अजूनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची डेडलाईनही संपली आहे. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही मेस्मा लावला जाऊ शकतो. आजच्या बैठकीत हा निर्णय होईल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मेस्माबाबतचा निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे. अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. निलंबित झालेल्या कामगारांवर कारवाई सुरू आहे. काही बडतर्फ झाले आहेत. या कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत असं त्यांना सांगितलं जात आहे. त्यामुळे कर्मचारी संपात आहेत. पण लोकांना वेठीस धरणं योग्य नाही. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून मेस्मा लावला जातो. या बाबतीत बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेऊ. मेस्मा कसा लावायचा किंवा आणखी काय करायचं ते पाहू. मेस्मा कुणाला लावायचा हे चर्चेअंतीच ठरवलं जाईल, असं परब म्हणाले.

Special Report | कर्जतमध्ये ऐन हिवाळ्यात वातावरण तापलंय!
Special Report | पुण्यात राज ठाकरेंसमोर आव्हान