VIDEO : Chandrakant Patil LIVE | भाजपात प्रदेश अध्यक्ष बदलण्याचा विषयच नाही – चंद्रकांत पाटील
दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं.
दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच सर्वत्र सध्या चर्चा रंगली आहे की, भाजपात प्रदेश अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, यावर आता स्वत: चंद्रकांत पाटील यांनीच स्पष्टीकरणं दिलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपात प्रदेश अध्यक्ष बदलण्याचा विषयच नाही.