PM Modi यांच्या भाषणात महाराष्ट्रला अपमान करण्याबाबत एकही शब्द नव्हता, Navneet Rana यांची माहिती

PM Modi यांच्या भाषणात महाराष्ट्रला अपमान करण्याबाबत एकही शब्द नव्हता, Navneet Rana यांची माहिती

| Updated on: Feb 08, 2022 | 7:05 PM

महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. तसं असतं तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता. सुप्रियाताई माझ्यापेक्षा सिनियर आहेत. मी त्यांचा आदर करतो पण त्यांनी मोदींच्या भाषणबाबत आहे हैराण होण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi Speech) यांनी आजही राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं बोलताना अनेकवेळा कौतुक केले आहे, त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यावरून पुन्हा महाविकास आगाडीवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांना महाराष्ट्राचा सन्मान नसता तर पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग ही कामे झाली नसती. महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. तसं असतं तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता. सुप्रियाताई माझ्यापेक्षा सिनियर आहेत. मी त्यांचा आदर करतो पण त्यांनी मोदींच्या भाषणबाबत आहे हैराण होण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे. तसेच शरद पवार यांच्या कामाबाबत शंका नाही, जिथं राज्याचे मुख्यमंत्री घरात बसतात मात्र, दुसरीकडे या वयातही शरद पवार साहेब काम करतात त्यांचं मोदींनी कौतुक केलं ही कोणतीही चूक नाही, अशी कोपरखिळी त्यांनी मारली आहे.

Dombivali मध्ये Navy कर्मचाऱ्याला माहाण करत लुबाडले, संपुर्ण घटना CCTV मध्ये कैद
Karnataka मध्ये हिजाब घालण्यावरुन वाद पेटला; हिजाब आणि भगवी शाल काय आहे नेमका वाद ?