Aaditya Thackeray | कस्तुरबा रुग्णालयातील गॅस गळतीत कोणतीही जीवीतहानी नाही,आदित्य ठाकरेंच स्पष्टीकरण
दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती (Kasturba Hospital Gas leak) झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली. LPG गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती (Kasturba Hospital Gas leak) झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली. LPG गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ई बसेस लोकार्पण सोहळा सोडून, रुग्णालयाकडे रवाना झाल्या.
कस्तुरबा रुग्णालय हे चिंचपोकळी परिसरात आर्थर रोडजवळ आहे. इथे LPG गॅस पाईपलाईन लीक झाली. त्यामुळे तातडीने रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढलं जात आहे. ही गॅसगळती तुलनेने मोठी नाही. सकाळी 11.30 च्या सुमारास गॅस गळती झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.