Uday Samant : मंत्री उदय सामंत यांचं कंत्राटी भरतीवर भाष्य; म्हणाले, भविष्यात कंत्राटी…

| Updated on: Oct 13, 2023 | 10:10 PM

VIDEO | वेगवेगळ्या विभागातल्या कंत्राट भरतीनंतर आता मुंबई पोलिसांतही कंत्राटी पोलीस भरती होणार आहे. यावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत सरकारला इशारा दिला. यानंतर मंत्री उदय सामंत यांनी कंत्राटी भरती भाष्य केले आहे. काय दिली प्रतिक्रिया?

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | वेगवेगळ्या विभागातल्या कंत्राट भरतीनंतर आता मुंबई पोलिसांतही कंत्राटी पोलीस भरती होणार आहे. यावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत सरकारला इशारा दिलाय. भविष्यात कंत्राटी भरतीचा अवलंब करावाच लागणार, असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. प्रत्येक गोष्टीला किती खर्च करावा, याचे शासनाला बंधन आहे. कंत्राटी भरतीतून लोकं घेतली जात आहेत त्यांना पुरेसा पगार देखील दिला जाईल आणि जात असल्याचेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. इतकेच नाहीतर शासन एजन्सीला पगार पुरवणार आहे. मात्र एजन्सी तो पगार कंत्राटी कर्मचाऱ्यांना जशाच्या तसा देते की नाही, याची खातरजमा करणं गरजेचं आहे. तर प्रत्येक विभागाच्या मंत्र्यानं हे करायला पाहिजे, असेही सामंत म्हणाले. पोलीस कंत्राटी संदर्भातील प्रश्न गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, ते यावर उत्तर देतील, याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नसल्याचेही उदय सामंत यांनी म्हटले.

Published on: Oct 13, 2023 10:10 PM
Chandrakant Patil : पालकमंत्री पद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, … ही एक छोटी तडजोड
मोठी बातमी : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, कुणी दिली धमकी?