Aaditya Thackeray | 31 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध असतील : आदित्य ठाकरे

| Updated on: Dec 29, 2021 | 4:28 PM

मुंबईसह राज्यभरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः मुंबईकरांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याची नियमावली पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितली.

मुंबईसह राज्यभरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः मुंबईकरांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याची नियमावली पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितली.

महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून ही चिंताजनक बाब आहे. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गंभीरपणे ही स्थिती हाताळावी, असे निर्देश पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिले आहेत. तसेच कोणत्या स्थितीत मुंबईतील (Rules for MUmbai) इमारती सील करायच्या, मुंबईत कोणत्या पार्ट्यांवर बंदी आहे, या सगळ्याविषयी आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले.

आदित्य ठाकरेंनी सांगितली नियमावली

कोरोना रुग्णांच्या अचानक वाढलेल्या आकड्यामुळे मुंबईकरांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलंच पाहिजे, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते नियम पुढील प्रमाणे-
– एखाद्या इमारतीत 10 पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती संपूर्ण इमारत पुढील पंधरा दिवस सील केली जाईल.
– सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या होणार नाहीत.
– 31 डिसेंबर किंवा न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर कोणीही पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कार्यक्रम करू नयेत, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Published on: Dec 29, 2021 04:28 PM
Rajesh Tope | राज्यात Lockdown लागणार का? या प्रश्नावर टोपे म्हणाले…| Omicron Corona
Narayan Rane : नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, राणेंच्या घरातील कर्मचाऱ्याने नोटीस काढली