मित्रासाठी स्टिअरिंग हातात घ्यायला काही हरकत नाही- रोहित पवार
आम्ही एकएक मतांची काळजी घेतली आहे त्याचबरोबर आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते काळजी घेत आहोत असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलय. सहा उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
मुंबई: काही वेळात विधानपरिषदेच्या मतदान (Vidhan Parishad Election)सुरुवात होणार आहे. राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अनेक तर्कवितर्क लावले जातायत. मित्रासाठी एखादं स्टिअरिंग हातात घ्यायला काही हरकत नसते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (National Congress Party)आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केलंय. आम्ही सगळ्या गोष्टी राज्यसभेविषयी पाहिलेल्या आहेत. आम्ही एकएक मतांची काळजी घेतली आहे त्याचबरोबर आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते काळजी घेत आहोत असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलय. सहा उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
Published on: Jun 20, 2022 09:38 AM