VIDEO : Political Crisis । शिंदे गटाकडून तिसरी याचिका दाखल
महाराष्ट्रातील राजकिय तिढा हा आता न्यायालयात गेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय. त्याबाबत आज सुनावणी पार पडत आहे. आता शिंदे गटाकडून तिसरी याचिका दाखल करण्यात आलीयं. एकनाथ शिंदे गट फोडण्यासाठी 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय.
महाराष्ट्रातील राजकिय तिढा हा आता न्यायालयात गेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय. त्याबाबत आज सुनावणी पार पडत आहे. आता शिंदे गटाकडून तिसरी याचिका दाखल करण्यात आलीयं. एकनाथ शिंदे गट फोडण्यासाठी 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्याबाबत 16 पिटिशनही सादर करण्यात आलेत. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्या 16 आमदारांना नोटीस बजावत दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. आमदार निलंबन आणि गटनेता कारवाईविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Published on: Jun 27, 2022 02:16 PM