‘थर्ड संडे’ संस्था सामाजिक सेवेत कार्यरत, ३ हजारांहून अधिकांना मदत, जाणून घ्या कसं आहे संस्थेचं कार्य?

| Updated on: Aug 15, 2023 | 10:12 PM

VIDEO | मागील 6 वर्षांपासून थर्ड संडे संस्था समाजसेवेत कार्यरत, इंजिनिअर, डॉक्टर, लॉयर्स अश्या अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा सहभाग...जाणून घ्या कसं चालतं संस्थेचं कार्य

मुंबई, १५ ऑगस्ट २०२३ | थर्ड संडे हा समाजसेवेसाठी स्वयंप्रेरित असलेल्या व्यक्तींचा समूह आहे. येथील स्वयंसेवक इंजिनिअर, डॉक्टर, लॉयर्स अश्या अनेक क्षेत्रात कार्यरत असून प्रत्येक महिन्यातील किमान एक दिवस गरजूंच्या उन्नतीसाठी समर्पित करतात. या संदर्भात समाजाच्या निरंतर विकासासाठी शक्य होईल त्या मार्गाने योगदान देणे हे थर्ड संडेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी राबविला जातो. थर्ड संडे समाजाची सेवा आणि वंचितांना मदत करून समाजाच्या सुधारणेसाठी कार्य करतो. येत्या रविवार २० ऑगस्ट, २०२३ रोजी थर्ड संडे चे ६ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने थर्ड संडेने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मेजर. विनय देगांकर (इंडियन अर्मी) रिटायर्ड, नाईक. चंद्रकांत गायकवाड (इंडियन आर्मी) आणि लक्ष्य फाउंडेशनचे प्रशांत कुलकर्णी ह्यांना आमंत्रित केलं आहे. तसेच समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या समाजसेवकाना आमंत्रित करून त्यांच्या कार्याचा सत्कार करण्याचा योजिले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने थर्ड संडे ने सैन्यात पाठीचा कणा जखमी (Spinal Cord Injury) सैनिकांसाठी कार्य करण्याऱ्या Paraplegic R ehabilitation Centre (खडकी, पुणे) आणि War Wounded (नोएडा, दिल्ली) या २ संस्थांना १ लक्ष रुपये दान देण्याचा निर्धार केला आहे.

Published on: Aug 15, 2023 10:12 PM
Raj Thackeray | मुंबई-गोवा हायवेवरुन मनसे आक्रमक, राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याकडे राज्याचं लक्ष
सांगलीमध्ये जयंत पाटील यांनी घेतली थार गाडीची ड्राईव्ह, बघा व्हिडीओ