“आज तुम्हा सर्वांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय ना?”, एकनाथ शिंदेंचा सर्वसामान्यांना सवाल
दहीहंडी उत्सवाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी मंचावर त्यांच्यावर श्रीकांत शिंदे आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर उपस्थित होती.
“दोन-अडीच वर्षे आपण निर्बंध पाळले. गणेशोत्सव हा मोठा उत्सव लवकरच येणार आहे. नियम पाळून हा उत्सव जल्लोषात साजरा करूयात. या राज्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आणण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. हे सरकार आपलं आहे. आज तुम्हा सर्वांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय ना? कारण मला अजूनही वाटत नाही की मी मुख्यमंत्री झालोय. मी तुमच्यातलाच आहे. आपल्याला असंच पुढे जायचंय. या राज्याचा विकास करायचा आहे”, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. दहीहंडी उत्सवाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी मंचावर त्यांच्यावर श्रीकांत शिंदे आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर उपस्थित होती.
Published on: Aug 19, 2022 03:50 PM