या सदनाचा सकारात्मकतेसाठी उपयोग व्हावा- पंतप्रधान

| Updated on: Jul 18, 2022 | 12:01 PM

येथे खुल्या मनाने संवाद होईल. गरज असेल तर वाद-विवाद व्हावी, टीका व्हावी, पण या सदनाचा सकारात्मकतेसाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

नवी दिल्लीः संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आजपासून सुरुवात होत आहे. 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन चालणार आहे. आज सकाळीच 9 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या जुन्या इमारतीत पोहोचले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. भारतीय संसद (Indian Parliament) ही आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. येथे खुल्या मनाने संवाद होईल. गरज असेल तर वाद-विवाद व्हावी, टीका व्हावी, पण या सदनाचा सकारात्मकतेसाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केली.

Published on: Jul 18, 2022 12:01 PM
PM Narendra Modi : आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, विरोधकांनी चर्चा करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसच्या भीषण अपघाताप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट