रिफायनरीसाठी माती सर्वेक्षण, बघा ‘tv9 मराठी’चा बारसूतून थेट आढावा
VIDEO | Barsu Refinery | बारसूतील आंदोलन स्थगित, मात्र माती सर्वेक्षण सुरु; 'tv9 मराठी'चा बारसूतून थेट आढावा
रत्नागिरी : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. अशातच रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी सर्वेक्षण मागे घ्या, पोलीस बळ मागे घ्या मग चर्चा करू अशी भूमिका काहीशी स्थानिक आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, यानंतर सरकार कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे. राज्यातील राजकीय वातावरण आता बारसू आंदोलनामुळे चिघळले आहे. काल सरकारकडून आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. रत्नागिरीतील बारसूमध्ये १३ हजार एकर जागेवर हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध होताना दिसतोय. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. मात्र यावेळी पोलीस बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र सध्या तीन दिवसांकरता बारसूतील आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान, या भागातील सर्वेक्षण सुरू असताना माती सर्वेक्षण आणि मातीचे परीक्षण करण्याचे काम त्याच वेगानं सुरू आहे. बघा बारसूतून ‘tv9 मराठी’ने घेतलेला थेट आढावा…