Thomas Cup 2022: 73 वर्षानंतर भारताने रचला इतिहास, बॅडमिंटमध्ये फायनल भारताने जिंकली
Thomas Cup 2022: भारताच्य बॅडमिंटन संघाने थॉमस कप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 73 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताचा तिरंग डौलाने फडकला आहे.
मुंबई: भारताच्य बॅडमिंटन संघाने (Indian Badminton team) थॉमस कप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 73 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताचा तिरंग डौलाने फडकला आहे. बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थॉमस कप (Thomas Cup) स्पर्धेची फायनल भारताने जिंकली आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूनी आज जबरदस्त खेळ दाखवला. स्पर्धेतील निर्णायक, महत्त्वाच्या टप्प्यावर खेळाचा स्तर उंचावला. भारतीय बॅडमिंटनपटुंनी बलाढ्या इंडोनेशियाला 3-0 ने धुळ चारली. भारताच्या विजयात शेवटचा अध्याय किदाम्बी श्रीकांतने (Kidambi Srikanth) लिहिला. भारताने पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. आजचा दिवस भारतात बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक आहे.14 वेळच्या विजेत्या बलाढ्या इंडोनेशियाला नमवून हे यश कमावलं आहे. इंडोनेशियाचा मोठा नामवंत खेळाडू क्रिस्टीला श्रीकांतने सहज नमवलं. सामना तिसऱ्या गेमपर्यंतही गेला नाही. फक्त दोन गेममध्ये श्रींकातने क्रिस्टीवर विजय मिळवला.