आंतरराष्ट्रीय कायदे तोडणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल – बायडन
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. आता यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय कायदे तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना धडा शिकवावाच लागेल. तिसरे महायुद्ध देखील होऊ शकते असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युद्ध समाप्तीची घोषणा करून, सैन्या माघारी बोलवावे अशी मागणी युरोपीयन रा्ष्ट्रांकडून करण्यात येत आहे. मात्र युद्ध सुरूच असल्याने आता यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय कायदे तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना धडा शिकवावाच लागेल. तिसरे महायुद्ध देखील होऊ शकते असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.