पुन्हा नवी धमकी, मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोट… ४८ तासांत १० लाख डॉलर, काय आला मेल?

| Updated on: Nov 24, 2023 | 1:21 PM

नुकतीच मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमलाही ही धमकी देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एक नव्या धमकीचा मेल

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : मुंबई हे शहर सातत्याने दहशतवाद, बॉम्बस्फोट अशा धमक्यांच्या सावटाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमलाही ही धमकी देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एक नव्या धमकीचा मेल मुंबईकरता आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा मेल आलाय. या मेलमध्ये ४८ तासांत १० लाख डॉलर बिटकॉईनच्या स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर अशी धमकी देण्याच्या प्रकारानंतर पोलिसांना कसून तपास सुरू करत या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञाताविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

Published on: Nov 24, 2023 01:21 PM