चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला; पुन्हा लॉकडाऊन!
चीनमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. ओमिक्रॉन विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
चीनमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. ओमिक्रॉन विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोबतच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी देशात नवीन रुग्णालये देखील उभारण्यात येत आहेत. चीन आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याने भारतात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.