छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्…

| Updated on: Dec 01, 2023 | 1:30 PM

छगन भुजबळ यांना १२ वेळी धमकीचे मेसेज आलेत. सौदागर सातनाक नावाच्या व्यक्तिच्या फोनवरून धमकी आल्याचा दावा करण्यात येतोय. यासंदर्भात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यावरून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई, १ डिसेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी सभेतून भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर त्यांचा पलटवार देखील जरांगे पाटील यांच्या सभेतून होत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच छगन भुजबळ यांना १२ वेळी धमकीचे मेसेज आलेत. सौदागर सातनाक नावाच्या व्यक्तिच्या फोनवरून धमकी आल्याचा दावा करण्यात येतोय. यासंदर्भात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या लग्नासाठी भुजबळ छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. याचवेळी त्यांना एक फोन आला होता. पण त्यांनी तो उचलला नव्हता. मात्र यानंतरच त्यांना हे धमकीचे मेसेज सुरू झालेत. तब्बल १२ वेळा धमकीचे मेसेज आलेत. म्हणून भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यावरून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Dec 01, 2023 01:30 PM
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासंबंधित प्रकरणात दत्ता दळवी यांना जामीन मंजूर, का झाली होती अटक?
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ‘या’ जागा लढवणार, अजित पवार यांनी स्पष्टच म्हटलं…