Pune | पेपर लीक केल्याप्रकरणी तिघांना अटक, पुणे सायबर सेलची कारवाई
पुणे सायबर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपरफुटीमध्ये दलालांचे काही समान धागेदोरे समोर आल्याचं पोलीस सांगत आहेत.
पुणे : शनिवारी रात्री जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख आणि दोन एजंट विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच पुणे सायबर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपरफुटीमध्ये दलालांचे काही समान धागेदोरे समोर आल्याचं पोलीस सांगत आहेत.