Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’कडून अजितदादांसाठी चक्क सोन्याची राखी, बघा काय म्हणाल्या?

| Updated on: Aug 18, 2024 | 3:42 PM

लाडक्या बहिणींचे ३००० हजार रूपये बँकेत जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे हे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर एकच झुंबड उडाली आहे. सांगलीमध्ये एका लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मंगळसूत्रातील सोन्याचं पदक काढून त्यांची राखी भेट दिल्याचे पाहायला मिळाले होते. तर दादांसाठी काही महिलांनी सोन्याची राखी बनवली आहे.

Follow us on

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागलेत, त्यामुळे महिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. यातून सांगलीतील महिलांनी भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट सोन्याची राखीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी बनवल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीतील महिला अजित पवार यांना ही सोन्याची राखी भेट म्हणून देणार आहेत. सांगलीतील लाभार्थी महिलांना आपल्या खात्यावर ३०० हजार रूपये आल्यानंतर स्वइच्छेने पैसे जमा करून ही राखी बनवून घेतली आहे. ही राखी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडे सुपूर्द केली आहे. शहरातील महिलांनी वर्गणी काढत तीन ग्रॅम वजनाची सोन्याची राखी दादांसाठी बनवली आहे आणि ही सोन्याची राखी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी महिला आघाडीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी अजित पवारांना ही सोन्याची राखी बांधण्यात येणार आहे. याबाबत लाभार्थी महिला वंदना मोरे, अस्विनी चेंडके, राष्ट्रवादी महिला आघाडी अजित पवार गटाच्या अध्यक्ष राधिका हारगे यांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.