Pimpri-Chinchwad | गुटख्याची अवैध वाहतूक करणारे तिघे अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Jul 11, 2021 | 10:11 AM

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड : गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गाडीला बनावट नंबर टाकून अवैध गुटखा आणि पानमसाला पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 100 पोती विमल पानमसाला आणि त्यासाठी लागणारी तंबाखू 100 पोती ,चारचाकी, मोबाईल फोन, असा एकूण 52.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश वंजी साबळे,संदीप गुलाब ठाकरे व विशाल पांडुरंग लवाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

 

 

Published on: Jul 11, 2021 10:11 AM
School | 85% पालकांची मुलांना शाळेत पाठवण्यास संमती, शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातील माहिती
Mumbai | एकनाथ शिंदे यांनी घेतली उज्ज्वल निकम यांची भेट, निकमांच्या हाती सेनेचा भगवा?