मुंबई-गोवा महामार्गावर ‘टायगर इज बॅक’चे बॅनर, काय आहे प्रकारण?
VIDEO | निलेश राणे यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली. नाराजी नाट्यानंतर आज प्रथमच निलेश राणे हे सिंधुदुर्गात येत असल्याने जिल्ह्यात जंगी स्वागत होतेय
सिंधुदुर्ग, २७ ऑक्टोबर २०२३ | गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी तडकाफडकी राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. निलेश राणे यांच्या राजीनाम्यानंतर सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली आहे. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. नाराजी नाट्यानंतर आज प्रथमच माजी खासदार निलेश राणे हे सिंधुदुर्गात येत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. सध्या हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.